Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशातल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


देशातल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘देशवासियांना नवसंवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा. नवे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. आपला देश प्रगतीच्या वाटेवर अधिक वेगाने वाटचाल करो.

सर्वांना उगादीच्या शुभेच्छा. हा मंगल सण तुम्हा सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करो, अशी प्रार्थना मी करतो. सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो.

मणिपूरच्या नागरिकांना साजिबू नोंग्मा पान्बा चिरोबा सणाच्या शुभेच्छा. हा सण आपल्या समाजात आनंद आणि सलोखा अधिक वृद्धिंगत करो.

नवरेह मुबारक! हे वर्ष अपूर्व आनंदाचे जावो, अशी प्रार्थना करतो. आगामी काळात प्रत्येकाच्या आकांक्षा पूर्ण होवोत. काश्मिरी पंडितांची संस्कृती खरोखरच विशेष आहे. अत्यंतिक धैर्य आणि लवचिक, वृत्ती या समाजाला लाभली आहे.’

B.Gokhale/S.Kakade/D.Rane