Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

धान्य खरेदीसाठी पंजाबला धान्य रोखी विषयक पत देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


धान्य खरेदीसाठी पंजाबला,धान्य रोखी पत खात्याच्या समायोजनासाठी(2014-15 च्या खरीप हंगामापर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली आहे.व्यय खात्याच्या या प्रस्तावाला पंतप्रधानांनी,व्यापार व्यवहार 1961 नियमावलीच्या नियम 12 अंतर्गत मान्यता दिली. यामुळे बँका, या राज्यातल्या, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धान्य विषयक पतपुरवठा करू शकतील त्यामुळे धान्य खरेदी प्रक्रियेत सातत्य राहून देशाची अन्नधान्य सुरक्षा कायम राहण्यासाठी मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha