पीएम्इंडिया
नवी दिल्लीतल्या एम्समधल्या आयुर्विज्ञान नगर परिसर आणि पश्चिम अन्सारी नगर मधल्या निवासी वसाहतींच्या पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड एन.बी.सी.सी. अर्थात राष्ट्रीय इमारत बांधणी महामंडळ हा प्रकल्प हाती घेणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 4441 कोटी रुपये असून, यामधे 30 वर्षांचा देखभाल खर्चाचा समावेश आहे. पाच वर्षात टप्प्या टप्प्याने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
पूर्वपिठीका:
पश्चिम अन्सारी नगर आणि आयुर्विज्ञान नगर परिसरातली निवासी घरं 50 ते 60 वर्षांपेक्षा जुनी असून, राहण्यासाठी ती धोकादायक बनली आहेत. या घरांच्या ढासळत्या स्थितीमुळे त्यांच्या देखभालीसाठी मोठ्याप्रमाणात खर्च करावा लागत होता. त्यानंतर आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडला होता.
N. Sapre/N. Chitale /D. Rane