पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युगांडा प्रजासत्ताकाच्या उपराष्ट्रपती जेसिका रोझ एपेल अलुपो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्णआणि सकारात्मक चर्चा झाली. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने ही भेट झाली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि युगांडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तंत्रज्ञान भागीदारी, क्षमता-वृद्धी, ज्ञानाची देवाणघेवाण, गुंतवणूक सुलभ करणे आणि दोन्ही देशांतील खासगी क्षेत्रांमधील सहकार्याच्या माध्यमातून प्राधान्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. दोन्ही देशांमधील विकास भागीदारी ही दोन्ही देशांसाठी बळ देणारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. परिवर्तनशील आणि समृद्ध युगांडा घडवण्यासाठी युगांडाच्या व्हिजन 2040 ला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे पंतप्रधानांनी पुन्हा स्पष्ट केले. दोन्ही देशांतील जनतेमधील घनिष्ठ संबंध या भागीदारीला सातत्याने अधिक बळकटी देत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
ग्लोबल साऊथ मधील देशांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी भारत आणि युगांडा यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक भक्कम करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडाच्या उपराष्ट्रपतींचे आभार मानले.
***
राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
PM @narendramodi met Vice President @jessica_alupo of Uganda on the sidelines of the BRICS Summit. He recalled his 2018 visit to Uganda and the Kampala Principles guiding India’s engagement with Africa. Discussions focused on deepening cooperation in healthcare, agriculture,… pic.twitter.com/FT4ktrnQvq
— PMO India (@PMOIndia) September 13, 2026
Delighted to meet Vice President Jessica Alupo of Uganda on the sidelines of the BRICS Summit. Recalled my memorable visit to Uganda in 2018 and the Kampala Principles that continue to guide India’s engagement with Africa.
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2026
We discussed ways to deepen cooperation in healthcare,… pic.twitter.com/Mg6jSsBJrt