Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नव संवत्सरच्या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 19 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव संवत्सरच्या शुभ प्रसंगी देशाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष समृद्धीने भरलेले जावो आणि देशाच्या प्रगतीसाठी सर्वांची बांधिलकी पुन्हा दृढ होवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

नव संवत्सर या अत्यंत विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी प्रार्थना केली की, येणारे नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, आत्मविश्वास आणि सेवेची भावना अधिक बळकट करु देत.  मोदी यांनी पुढे आशा व्यक्त केली की, ही मूल्ये राष्ट्र उभारणीच्या सामूहिक प्रयत्नांना नवीन गती देतील. तसेच त्यांनी सर्व नागरिकांसाठी अनंत सुख, यश आणि उत्तम आरोग्याची कामना केली.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले;

“देशवासीयांना नव संवत्सरच्या अनंत शुभेच्छा. माझी कामना आहे की हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांच्या जीवनात साहस, आत्मविश्वास आणि सेवेची भावना अधिक सशक्त करो, ज्यामुळे राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांनाही नवी ताकद मिळेल.”

“नव संवत्सर या विशेष प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. प्रत्येकाला अनंत सुख, यश आणि उत्तम आरोग्य लाभू दे. मी प्रार्थना करतो की येणारे नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात साहस, आत्मविश्वास आणि सेवेची भावना अधिक दृढ करु दे. यामुळे राष्ट्र उभारणीच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना नवीन गती मिळू दे.”

 

* * *

शिल्पा नीलकंठ/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai