पीएम्इंडिया
6 जानेवारी रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत, नागरी हवाई सहकार्य क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याला पूर्व-कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. पंतप्रधानांच्या सिंगापूर भेटी दरम्यान नोव्हेंबर 2015 साली भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिंगापूर-को ऑपरेशन एंटरप्राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
नागरी हवाई क्षेत्रात परस्पर सहकार्य स्थापन करणे हा या सामंजस्य कराराचा हेतू आहे. प्रारंभीच्या काळात याअंतर्गत जयपूर आणि अहमदाबादचे विमानतळ विचारात घेतले जातील. परस्पर सहमतीने इतर विमानतळांबाबतही हे सहकार्य रोखले जाईल.
नागरी हवाई क्षेत्रात तज्ञ नियोजन आणि संरचना, वाहतूक विकास, व्यावसायिक विकास, सेवा दर्जात सुधारणा, प्रशिक्षण आणि विकास, मालवाहतूक हाताळणी आणि व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती आणि पूर्ण तपासणी तसेच परस्पर सहमतीच्या कोणत्याही अन्य बाबतीत सहकार्य ही या सामंजस्य कराराची ठळक वैशिष्टये आहेत.
जगात उत्तम व्यवस्थापनासाठी नावाजला गेलेला एक विमानतळ सिंगापूर सरकारकडे आहे आणि त्याने गेली कित्येक वर्षे आपली उच्च क्रमवारी सातत्याने कायम राखली आहे.
M.Pange/S.Tupe/M.Desai