Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निम्न स्तरावरील नाविन्यपूर्ण संकल्पनांसंदर्भात सहकार्याबाबत दक्षिण आफ्रिकेसोबत सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने निम्न स्तरावरील नाविन्यपूर्ण संकल्पनांसंदर्भात सहकार्याबाबत दक्षिण आफ्रिकेसोबत सामंजस्य कराराला मंजुरी दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत दोन्ही देशांमध्ये 7 जुलै 2016 रोजी प्रिटोरिया येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही देश नाविन्यपूर्ण संकल्पनांशी संबंधित मंच, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे संयुक्तरित्या आयोजन करतील, परस्परांशी तंत्रज्ञानविषयक देवाणघेवाण करतील आणि नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

B.Gokhale/M.Pange/P.Kor