Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि मालदीवच्या निवडणूक आयोगामधल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रातल्या सहकार्यासाठी मालदीव निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्यातल्या सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत संस्थागत आणि तंत्रविषयक विकास या क्षेत्रात ज्ञान आणि अनुभवाची देवाण घेवाण, माहितीचे आदान प्रदान करण्याला सहकार्य, संस्थात्मक बळकटी, क्षमता वृद्धी, कर्मचारी प्रशिक्षण, नियमित सल्लामसलत यांचा यात समावेश आहे.

या प्रस्तावित सामंजस्य करारामुळे द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. मालदीवच्या निवडणूक आयोगाला तंत्र सहाय्य, क्षमता निर्मिती सहाय्य आणि निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्य करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor