Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कर्तव्यनिष्ठा, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एक्सया सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलीस दल- (सीआरपीएफ)च्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील आव्हानात्मक परिस्थितीत सीआरपीएफने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कठीण प्रसंगी देखील कर्तव्य, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे. मानवी संकटांवर मात करण्यातही या बलाचे योगदान उल्लेखनीय आहे.

@crpfindia

***

शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai