पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2015 दरम्यान आयर्लंड व अमेरिकेला भेट देणार आहेत.
फेसबूकवरील संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणतात,
” 23 सप्टेंबर 2015 रोजी मी आयर्लंडला भेट देत आहे. 60 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान आयर्लंडला भेट देत आहे. आयर्लंडमध्ये मी आयर्लंडचे नेते (तायओशी) श्री इंदा केनी यांची भेट घेणार आहे. आगामी काळात आयर्लंडसोबत जनतेचे परस्परांशी नाते घट्ट करण्यावर व आर्थिक संबंध दृढ करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. आयर्लंडमधील भारतीय समुदायाशी मी संवाद साधणार आहे.
24 सप्टेंबर 2015 रोजी माझा अमेरिकेचा दौरा सुरू होईल. मागचा माझा अमेरिका दौरा आणि अध्यक्ष ओबामा यांनी यावर्षी केलेला दौरा हा या भेटीचा पाया ठरेल.
मी अमेरिका भेटीवर एका ऐतिहासिक क्षणी जात आहे, जेंव्हा संयुक्त राष्ट्र 70 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. भारताच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघटनेचे फार महत्त्व आहे. जुलैमध्ये मी, संयुक्त राष्ट्रसंघाची विषयपत्रिका आणि सुधारणा याबद्दल 193 देशांच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. मला आनंद होत आहे की, बहुतांश देशांनी आमच्या या दृष्टीला पाठिंबा दिला.
न्यूयॉर्क शहरात मी, यूएन सस्टेनेबल डेवलपमेंट समिट फॉर फॉर्मल ऍडोप्शन ऑफ पोस्ट-2015 या परिषदेला संबोधित करणार आहे. ऐक्य हाच पाया असलेल्या संस्कृतीतून मी येत असल्यामुळे या परिषदेला संबोधित करण्याचा मला आनंद होत आहे. नवी उद्दिष्टे भारताच्या शाश्वत विकास आणि आमच्या प्रमुख योजना यांच्याशी साधर्म्य असणारी आहेत.
शांततेविषयी अध्यक्ष ओबामांनी आयोजित केलेल्या परिषदेत मी सहभागी होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या शांतीदूतांपैकी ऐतिहासिकरित्या भारताचे मोठे योगदान आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीमोहिमेत भारताच्या 180,000 पेक्षाही जास्त सैन्यदलाचा सहभाग राहिला आहे, जो कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे. जगभर आमचे शांतीसैन्य कठीण परिस्थितीतही शांततेसाठी काम करत आहे, शांततेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूर महिला आणि पुरुषांना मी आदरांजली अर्पण करतो. याचा आम्हाला अभिमान आहे. शांतीप्रक्रिया अधिक परिणामकारक कशी होईल, याविषयावर मी विचार मांडणार आहे. यावर्षी न्यूयॉर्कमध्ये भारत जी-4 राष्ट्रप्रमुखांची परिषद आयोजित करणार आहे, याचा मुख्य भर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद सुधारणा यावर असेल. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा 70 वा वर्धापनदिन ही सुधारणेच्या चर्चेसाठी अतिशय योग्य वेळ आहे. या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने 20 वर्षानंतर चर्चा करण्यासाठी औपचारिकरित्या एका मसुद्याचा स्वीकार केला आहे.
या भेटीदरम्यान मी बऱ्याच जागतिक नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच आघाडीचे गुंतवणूकदार आणि आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्यांबरोबर संवाद साधणार आहे. भारतातील गुंतवणूकीची संधी या विषयावर स्नेहभोज आयोजित केला आहे, ज्यात प्रमुख फॉर्च्युन 500 कंपन्या सहभागी होणार आहेत. आम्ही गेल्या वर्षापासून अमेरिकी उद्योगजगताच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहोत आणि मिळणारे परिणाम प्रोत्साहित करणारे आहेत.
अमेरिका भेटीदरम्यान मी 26 व 27 सप्टेंबर रोजी पश्चिम तट (वेस्ट कोस्ट) ला भेट देणार आहे, तेथे मी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. 33 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान वेस्ट कोस्ट जो की अभिनव शोधांचे व तंत्रज्ञानाचे माहेरघर आहे, त्याला भेट देत आहे.
फेसबूक मुख्यालयात मी टाऊनहॉल प्रश्नोत्तरात श्री मार्क जुकेरबर्ग यांच्यासोबत सहभागी होणार आहे. आम्ही काही जागतिक मुद्दे व भारताशी संबंधित मुद्दे, प्रामुख्याने आर्थिक व सामाजिक मुद्यांवर चर्चा करणार आहोत. टाऊनहॉलचा कार्यक्रम तुम्ही चुकवू नका. मी यापूर्वीच तुम्हाला तुमचे प्रश्न फेसबुकवर किंवा ‘नरेंद्र मोदी मोबाईल ॲप.’ वर पाठवण्यास सांगितले आहे. गुगल (अल्फाबेट) आणि तेस्ला मोटर्स याठिकाणी जाऊन मी नावीन्यपूर्वक तांत्रिक बाबी पाहणार आहे. यूएसडीओसी व स्टॅन्फोर्ड विद्यापीठाने आयोजित केलेल्या अक्षय ऊर्जा गोलमेज परिषदेला मी संबोधित करणार आहे.
मला ज्या कार्यक्रमाची उत्कंठा आहे, तो कार्यक्रम म्हणजे ‘इंडिया-यूएस स्टार्ट अप कनेक्ट.’ भारत हे स्टार्ट अपमध्ये प्रत्येक क्षेत्रात उभरती बाजारपेठ आहे आणि ती तशीच पुढे घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे. स्टार्ट अप सेक्टरमध्ये जगाने आमची नवनिर्मिती क्षमता पाहावी. या कार्यक्रमात, भारतीय स्टार्ट अप क्षेत्रातील एक गट आपली नवनिर्मिती अमेरिकी उद्योगजगतासमोर मांडून इतरांना मागे टाकणारी भागीदारी करण्यावर भर देणार आहे.
27 सप्टेंबर रोजी सॅन जोन्समध्ये मी भारतीय समुदायाला संबोधित करणार आहे. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाने कोणतीच कसर ठेवली नाही. दोन्ही समुदायांमध्ये प्रचंड योगदान देणाऱ्या आमच्या भारतीय समुदायाचा आम्हाला अभिमान आहे. मला खात्री आहे की, माझा अमेरिका दौरा फलदायी ठरेल आणि जगातील प्राचीन व मोठ्या लोकशाहींदरम्यानचे नाते अधिक दृढ होईल.
S. Thakur/M. Desai
My visit to Ireland, a first by a PM in almost 60 years, will focus on improving people-to-people & economic ties. http://t.co/IEn2zqxAsE
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2015
My USA visit will build on the substantial ground covered during my visit last year & President Obama's visit to India earlier this year.
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2015
In New York, I will take part in summits, bilateral meetings & meetings with top investors. http://t.co/nWJwVLuhoA
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2015
My visit to West Coast will focus on start-ups, innovation & technology and how to further support them in India. http://t.co/rQotIQhBeF
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2015
Indian diaspora has been a source of immense strength for us. Will interact with Indian community in San Jose. http://t.co/rPWm9L54Fn
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2015