पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी आज क्वालालंपूर येथे आसियान-भारत शिखर परिषदेला संबोधित केले.
आर्थिक अनिश्चितता, राजकीय उलथा-पालथ आणि सुरक्षेला निर्माण झालेला धोकायाआंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुविध आव्हानांच्या काळात आपण भेटत आहोत. यासंघर्षमय काळात, भारत आणि आसियान हे दोन आशेचे किरण आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेला संबोधित करतांना सांगितले.
भारतात बदलाचे मोजमाप हे प्रचंड आहे, त्यामुळे भारतात आर्थिक संधीही प्रचंड आहेत. आणि आता सध्या आमच्याकडे खुले आणि स्वागत करणारे वातावरण आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय करण्यासाठी सुलभ असणाऱ्या मानांकनात भारताने घेतलेल्या मोठया झेपमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले आहे आणि आम्ही आमचा सुधारणा कार्यक्रम वेगाने राबवू. “आसियान” देशांची अर्थव्यवस्था चेतनामय झपाटयाने मार्गक्रमण करत आहे.आपण आपल्या 1.9 अब्ज लोकांसाठी समृध्दता अधिक बळकट करु याबाबत मला कोणतीही शंका वाटत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
समृध्दता वाटून घेण्यासाठी एकमेकांशी जोडले जाणे, हा मार्ग आहे. त्रिकोणीय महामार्ग प्रकल्पाची चांगली वाटचाल सुरु असून, हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण व्हावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आसियान-भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान निधी, जो सध्या एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, त्यामध्ये भर घालून आम्ही हा निधी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स करणार आहोत. याशिवाय कमी खर्चाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि संशोधन आणि विकास प्रकल्पातील भागीदारी यांचे व्यापारीकरण होण्यासाठी आसियन-भारत शोध मंच स्थापित करण्याची आमची मनिषा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आसियान शिखर परिषदेच्या वेळी, पंतप्रधानांनी चिनी प्रजासत्ताकाचे पंतप्रधान ली क्वेईआंग यांची भेट घेतली.
अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद या संदर्भातील जागतिक परिस्थितीचा दोन्ही बाजूंनी आढावा घेतला. मंदगती असतांनाही, भारताने विकासाची गती कायम राखल्याचे चीनच्या पंतप्रधानांनी निदर्शनाला आणून दिले. पॅरिसमधल्या कॉप-21 परिषदेच्या तयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा आघाडी पुढाकाराबाबत चीन पंतप्रधानांना माहिती दिली आणि यात सहभागी होण्याचे आमंत्रण चीनला दिले. दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र आलेच पाहिजे, याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
दोन्ही बाजूंनी व्यापार आणि गुंतवणुकीबाबत द्विपक्षीय चर्चा केली. चीन बरोबरच्या भारताला येत असलेल्या मोठया व्यापार तुटीबाबत वाटत असलेल्या चिंतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. जगातील कोणत्याही द्विपक्षीय संबंधामध्ये भारत-जपान द्विपक्षीय संबंधात दृढ होण्याचे सर्वाधिक सामर्थ्य असल्याचा पुनरुच्चार शिंजो ॲबे यांनी केला. द्विपक्षीय संबंधाबाबत जपानी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि शिंजो ॲबे यांच्या भारत भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचे सांगितले. बदलाचे मोठे सामर्थ्य असणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉरसारख्या प्रकल्पांबाबत भारताशी सहकार्य करण्यासाठी जपान पुढाकार घेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रादेशिक जोडणी, सागरी सुरक्षा, आगामी कॉप-21 परिषद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणा आणि दहशतवाद आणि इतर मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Meeting PM @AbeShinzo is always a delight. Had comprehensive talks with him at the lunch he hosted. pic.twitter.com/hcAeSkCxdN
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
My speech at ASEAN-India Summit. As the world faces economic challenges, India & ASEAN are bright spots of optimism. https://t.co/Jgg4x1heO6
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
Highlighted need to expand our trade & economic partnership & increase cooperation in development of Ocean Economy. pic.twitter.com/1CbIZh5Lo8
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
ASEAN-India Summit, bilateral meetings & investment meet....sharing highlights of the day. https://t.co/mC8DeGbOSC
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2015
PM @AbeShinzo hosts PM @narendramodi for lunch. pic.twitter.com/oOPdUW0vAn
— PMO India (@PMOIndia) November 21, 2015