Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींना अभिवादन


नवी दिल्‍ली, 31 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींनी सेवाभाव व अध्यात्मासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांचा कार्याचा समाजमनावर अमीट ठसा उमटला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. आदरणीय स्वामीजींनी अनेक शैक्षणिक संस्थांची व संशोधन केंद्रांची स्थापना केली. लोकांना शिक्षणातील आनंद समजावून सांगण्याप्रती ते वचनबद्ध होते असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात,

“वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थानचे श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी आपले अवघे आयुष्य सेवा व अध्यात्मासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे सुरू केली आणि लोकांना शिक्षणामधला आनंद समजावून सांगण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. आपल्या शिकवणीतून साधेपणा, दयाळू वृत्ती व नीतीमत्ता या गुणांवर त्यांनी नेहमीच भर दिला. भारतीय संस्कृती व या मातीतील नीतीमूल्ये यांचे जतन करण्यासाठी व ती लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत.”  

 

* * *

हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai