पीएम्इंडिया
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे मंगळवार, 08 सप्टेंबर रोजी “सध्याची जागतिक परिस्थिती, भारतासाठी संधी”, या विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे.
कॅबिनेट मंत्री, सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेतील उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगजगताचे प्रतिनिधी, आघाडीचे बँक व्यावसायिक, अर्थतज्ज्ञ अशा निवडक 40 प्रतिनिधींचा या बैठकीत सहभाग असणार आहे.
जागतिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन भारताला यात काय संधी आहेत, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.