Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन डीसी मधील कार्यक्रम 6 जून 2016

पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन डीसी मधील कार्यक्रम 6 जून 2016

पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन डीसी मधील कार्यक्रम 6 जून 2016


पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. त्यांनी अर्लिग्टन स्माशनस्थळाला भेट देऊन अज्ञात सैनिकांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पित केली.

मोदींनी अंतराळ शटल कोलंबिया स्मारकाला भेट देऊन तिथे देखील पुष्पांजली अर्पण केली. कोलंबिया अपघातात मरण पावलेल्या अंतराळवीर कल्पना चावला यांचे पती जीन पीरे हॅरिसन तसेच अंतराळवीर सुनिता विल्यम ही देखील यावेळी उपस्थित होते.

भारतातून फार पूर्वी नाहीशा झालेल्या प्रतिमा परत करण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेने वेग दिला असून एकूण 200 प्रतिमांपैकी 12 प्रतिमा भारताला परत करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे ॲटॉर्नी जनरल लोरेट्टा लिंच यांनी दिली. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, सांस्कृतिक वारसा हा दोन्ही देशांमधील दृढ बंध असतात. काहीजणांसाठी या प्रतिमांची किंमत काही रुपये असेल पण आमच्यासाठी भारतात हा अमूल्य ठेवा आहे कारण हा आमच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे.

पंतप्रधानांनी नंतर विचारवंतासोबत संवाद साधला ज्यामध्ये अटलांटिक परिषद आणि इतर संस्थांचा समावेश होता.

S.Mhatre/B.Gokhale