Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनच्या पायाभरणीचा समारंभ संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या अदलान इथल्या अन्नपूर्णा धाम ट्रस्ट येथे शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनाचा पायाभरणी समारंभ झाला.

प्रत्येक काळात उद्‌भवलेल्या समस्या सोडवण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची समृद्ध परंपरा भारतात असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले. शिक्षण आणि सिंचन सुविधा सुधारण्यासाठी सर्व समाज एकत्रित असल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. अशा सामाजिक उपक्रमांमुळे लोकांचा मोठा फायदा झाल्याचे ते म्हणाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, सहकार क्षेत्रासाठीचे सरदार पटेल यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाही.

गुजरातमधल्या जनतेने अन्न प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. शेतकरी आणि उद्योगांना अशा मूल्यवर्धित उपक्रमांमुळे फायदा होईल असे ते म्हणाले. अन्नपूर्णा धाम ट्रस्टने सर्वांसाठी संपन्नता आणि लिंग समानता यासाठी समाजाला बळ दिले असल्याचे पंतप्रधानांनी या अन्नपूर्णा यांना आदरांजली अर्पण करताना सांगितले.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor