Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आयुर्वेद आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या महत्त्वावर आधारित एक लेख सामायिक केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
या लेखात आयुर्वेदामध्ये आरोग्याचे जतन करण्यावर कसा भर दिला जातो आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लेखातून कुटुंबांना अधिक आरोग्यदायी सवयी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे; ज्यामध्ये सकस आहार, नियमित योगाभ्यास, पुरेशी झोप आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी गुंतवणूक करणे आणि कुटुंबांसाठी अधिक आरोग्यदायी भविष्य घडवणे किती महत्त्वाचे आहे, यावरही यात भर देण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
या धनत्रयोदशीला, उत्तम आरोग्याचा संकल्प करा!
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव @mpprataprao यांनी आयुर्वेदामध्ये आरोग्याचे जतन करण्यावर कसा भर दिला जातो आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा का महत्त्वाची आहे, हे अधोरेखित केले आहे. त्यांनी कुटुंबांना अधिक आरोग्यदायी सवयी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे—जसे की सकस आहार, नियमित योगाभ्यास, पुरेशी झोप आणि वेळेवर आरोग्य तपासणी.
चला,—आपल्या प्रियजनांचे आरोग्य आणि आपल्या कुटुंबांसाठी एक अधिक आरोग्यदायी भविष्य या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करूया.

 

***

Sushma Kane / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai