Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कतारचे अमिर यांच्याशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

यावेळी पंतप्रधानांनी कतारचे फादर अमिर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त केल्या.

आधुनिक कतारचे मुख्य शिल्पकार म्हणून फादर अमीर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून पंतप्रधानांनी त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आदरांजली वाहिली आणि गेल्या काही वर्षांमध्ये भारत-कतार संबंध दृढ करण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा तसेच भारताबद्दल आणि कतारमधील भारतीय समुदायाबद्दल त्यांना वाटणाऱ्या गाढ स्नेहाचा उल्लेख केला.

कतारच्या अमीरांनी पंतप्रधानांच्या दूरध्वनीबद्दल त्यांचे आभार मानले आणि या कठीण काळातील‌ सहाय्यकारी शब्दांबद्दल समाधान व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी फादर अमीरांचा वारसा पुढे नेण्याचा तसेच भारत-कतार सामरिक भागीदारी व जनते- जनतेमधले  संबंध अधिक दृढ करण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.

एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी दोघांनी सहमती दर्शविली.

***

सोनाली काकडे/निलिमा चितळे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai