Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी घेतली रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भेट

पंतप्रधानांनी घेतली रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.

नेत्यांनी आर्थिक, वित्तीय आणि ऊर्जा क्षेत्रासह द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली आणि या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीबाबत समाधान व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी युक्रेनशी संबंधित ताज्या घडामोडींसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा केली. युक्रेनमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अलीकडच्या काळात  घेतलेल्या पुढाकारांना  पंतप्रधानांनी पुन्हा पाठिंबा दर्शवला आणि संघर्ष जलदगतीने थांबविण्याचा आणि कायमस्वरूपी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या गरजेवर भर दिला.

दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना असलेल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या 23व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.

***

आशिष सांगळे / संपदा पाटगावकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai