Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी देशभरातल्या नागरिकांना नूतनवर्षानिमित्त साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या नूतनवर्षानिमित्त साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“नूतनवर्ष साजरा करणाऱ्या देशभरातल्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. हे नूतनवर्ष तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट घेऊन येवो.

माझ्या सिंधी बांधवांना चेटी चांद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही प्रभू झुलेलाल ला नमन करतो आणि त्यांच्या आशिर्वादाची कामना करतो.

महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. हे वर्ष आनंददायी आणि यशदायी ठरेल अशी मी आशा करतो.

उगादी निमित्त सर्वांना शुभेच्छा. मला आशा आहे की हे नववर्ष आपल्या समाजात शांती आणि समृध्दी घेऊन येईल.

नागरिकांना नवरेहच्या शुभेच्छा. मी प्रार्थना करतो. येणारे वर्ष तुमच्या जीवनात समृध्दी आणि सद्‌भावना घेऊन येवो .

मणिपूरच्या लोकांना साजिबू चिरौबाच्या शुभेच्छा. आगामी वर्ष तुमच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करो.” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S.Mahtre/B.Gokhale