Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवरात्रीच्या आध्यात्मिक सारावर आणि आई अंबेच्या भक्तीमय दिव्य वातावरणावर प्रकाश टाकला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर नवरात्रीच्या गहिऱ्या आध्यात्मिक वातावरणाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. आई अंबेची भक्ती कशा प्रकारे मनाला गहिऱ्या शांती आणि ऊर्जेने भारून टाकते, हे त्यांनी अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई अंबेला समर्पित असलेले एक भक्तीगीत देखील सामायिक केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
“नवरात्रीमध्ये आई अंबेच्या भक्तीने व्यापलेले वातावरण मनाला गहिऱ्या शांती आणि ऊर्जेने भारून टाकणारे आहे. मातेला समर्पित असलेल्या श्रद्धा आणि विश्वासाचा निनाद हृदयाची स्पंदने जागृत  करते.”

PM India

***

NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai