Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक परिदृश्याला आकार देणारे महान व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. 

बाळासाहेब ठाकरे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी, छाप पडणाऱ्या वक्तृत्वासाठी व अविचल निष्ठांसाठी ओळखले जात होते , आणि जनमनाशी त्यांचे अतूट नाते होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

राजकारणाच्याही पलीकडे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना  संस्कृती, साहित्य व पत्रकारितेमध्ये खूपच रस होता. एक व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांची कारकीर्द पाहिली तर त्यातून समाजाविषयी त्यांची  तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि विविध मुद्द्यांवरील त्यांची निर्भीड टिप्पणी विसरता येणार नाही असे पंतप्रधांनी नमूद केले. 

बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी असलेला दृष्टिकोन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सदैव सुरु राहतील असे पंतप्रधान म्हणाले.  

पंतप्रधानांनी  एक्स वर लिहिले, कि 

“महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. 

तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. 

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

***

NehaKulkarni/UmaRaikar/DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai