Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे विश्वचषक विजयाबद्दल केले अभिनंदन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंडर-19 क्रिकेट संघाने विश्वचषक विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.

संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल आणि असाधारण कौशल्य दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी संघाचे कौतुक केले. या विजयामुळे अनेक तरुण खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.

‘एक्स’ (X) वर दिलेल्या संदेशात मोदी म्हणाले:

“भारताची क्रिकेट प्रतिभा तळपली!

विश्वचषक मायदेशी आणल्याबद्दल आपल्या अंडर-19 संघाचा अभिमान वाटतो. संघाने संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला खेळ केला आणि असाधारण कौशल्य दाखवले. या विजयामुळे अनेक तरुण खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai