Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मनाची शांतता आणि बुद्धिमान विचारांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कठीण प्रसंगात शांत राहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधान म्हणाले की, देशातील तरुण जे साध्य करण्याचा निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात. आपल्या युवाशक्तीच्या जोरावरच आपला देश आज विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:

“देशातील युवा जो निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात. आपल्या युवाशक्तीच्या जोरावरच आपला देश आज विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे.

व्यसने वाऽर्थकृच्छ्रे वा भये वा जीवनान्तके।
विमृशन् वै स्वया बुद्ध्या धृतिमान् नावसीदति॥”

संकटकाळात, आर्थिक विवंचनेत किंवा जीवावर बेतलेल्या प्रसंगात जी व्यक्ती शांत राहते आणि आपल्या बुद्धीने विचारपूर्वक निर्णय घेते, ती खचून जात नाही. कठीण परिस्थितीत घेतलेले शांत आणि विचारपूर्वक निर्णय त्या व्यक्तीला दुःख आणि हानीपासून वाचवतात.

***

NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai