Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या 130 व्या भागातील  ठळक मुद्दे केले सामायिक


 

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 130 व्या भागातील त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे सामायिक केले आहेत.

एक्स या समाज माध्यमावरील पोस्टच्या मालिकेत, मोदी म्हणाले; 

“2026 मधील ‘मन की बात’ चा पहिला भाग राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी झाला होता.

मतदार बनणे हा उत्सवाचा प्रसंग असू द्या. शेवटी, मतदार असणं हा एक मोठा विशेषाधिकार आणि जबाबदारी आहे.”

#MannKiBaat”

“चला 2026 हे वर्ष गुणवत्तेसाठी समर्पित करूया.

चला ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’वर लक्ष केंद्रित करूया.

हे सुनिश्चित करूया, मेड इन इंडिया = उत्कृष्टता.”

#MannKiBaat”

“उत्तर प्रदेशातील आजमगढमधून वाहणारी तमसा नदी पुनरुज्जीवित करण्याचा उपक्रम हा जनभागीदारीच्या यशाचे एक अद्भुत उदाहरण आहे. येथील लोकांनी आपल्या सामूहिक शक्तीने केवळ एका नदीलाच नवजीवन दिले नाही, तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या प्रवाहालाही नवे आयुष्य दिले आहे.”

#MannKiBaat”

“आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील नागरिकांनी जलस्रोत पुनर्संचयित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो.”

#MannKiBaat”

“आपली जेन-झी पिढी ‘भजन क्लबिंग’कडे वळत आहे… विशेषतः भजनांच्या पावित्र्याचा विचार करता ही आध्यात्मिकता आणि आधुनिकतेची सुंदर सांगड आहे.”

#MannKiBaat”

“तमिळ, तेलुगू, पंजाबी आणि इतर भाषा शिकवण्यापासून ते हेरिटेज वॉक, तसेच पश्चिम बंगालमधील वस्त्रकला आणि संगीत सादर करण्यापर्यंत, मलेशियातील भारतीय समुदाय अद्भुत कार्य करत आहे!”

#MannKiBaat”

“गुजरातमधील एक गाव जिथे सर्वजण एकत्र जेवतात… प्रेरणादायी आहे ना!”

#MannKiBaat”

“अनंतनागमधील शेखगुंड येथील लोकांनी एकत्र येऊन अमली पदार्थ, तंबाखू आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक आहे.”

#MannKiBaat”

“पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील फरीदपूर येथील विवेकानंद लोकशिक्षा निकेतनसारख्या संस्था गेल्या अनेक दशकांपासून निःस्वार्थपणे समाजसेवा करत आहेत. यामुळे इतरांची काळजी घेण्याची आपली संस्कृती अधोरेखित होते.”

#MannKiBaat

“अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील हे प्रयत्न स्वच्छता, पुनर्वापर आणि ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनांप्रति आपल्या तरुणांची असलेली उत्कटता आणि बांधिलकी दर्शवतात.”

#MannKiBaat

“पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील बेनॉय दास यांनी सिद्ध करून दाखवले आहे की पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनही मोठे बदल घडू शकतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या जिल्ह्यात हजारो झाडे लावली असून त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेली हिरवाई पाहण्यासारखी आहे!”

#MannKiBaat

“जंगलातील औषधी वनस्पतींची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील बीट गार्ड जगदीश प्रसाद अहिरवार यांचे प्रयत्न प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार एक पुस्तकही प्रकाशित झाले असून ते वन विभागाबरोबरच संशोधकांसाठीही उपयुक्त ठरत आहे.”

#MannKiBaat

“भरड धान्य किंवा श्री अन्न हे भारतातील तरुण आणि शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय झालेले दिसते, हे पाहून आनंद वाटतो.”

#MannKiBaat

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai