Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत


नवी दिल्‍ली, 18 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. 

एक्सवर केलेल्या पोस्टच्या मालिकेत मोदी म्हणाले;

“महिला आरक्षणाला विरोध करून विरोधी पक्षांनी संविधान निर्मात्यांच्या भावनांचा अपमान केला आहे. देशातील नारी शक्तीच्या स्वाभिमानावर आणि आत्मसन्मानावर आघात करणारे आता माता-भगिनी आणि मुलींच्या रोषापासून वाचू शकणार नाहीत.”

 

“नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित दुरुस्ती भारतातील महिलांना नवीन भरारी देण्यासाठीचा एक महायज्ञ होता. परंतु काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि डीएमके सारख्या पक्षांनी याची भ्रूणहत्या केली आहे.”

 

“मला वैयक्तिकरित्या आशा होती की महिला आरक्षणाबाबत काँग्रेस आपल्या पापांचे प्रायश्चित्त करेल. परंतु त्यांनी पुन्हा एकदा ही संधी गमावली आहे.”

 

“नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करण्याचे एक मोठे कारण आहे- घराणेशाही असलेल्या पक्षांची भीती! त्यांना असे वाटते की जर महिला सशक्त झाल्या, तर त्यांचे नेतृत्व धोक्यात येईल.”

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai