Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रियाधमधल्या एल ॲन्ड टी कामगारांच्या निवासी संकूलाला भेट दिली

पंतप्रधानांनी रियाधमधल्या एल ॲन्ड टी कामगारांच्या निवासी संकूलाला भेट दिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रियाधमधे लार्सन ॲन्ड टुब्रो कर्मचाऱ्यांच्या निवासी संकूलाला भेट दिली. रियाध मेट्रोचा एक तुकडा एल ॲन्ट टी उभारत आहे. या प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची, पंतप्रधानांनी प्रशंसा केली. तुमच्या कठोर परिश्रमाने आपल्याला इथे आणल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारतीय कामगारांनी परदेशात केलेल्या कार्यामुळे केवळ पैसाच मिळतो असे नव्हे तर भारताची प्रतिमाही उंचावते असे पंतप्रधान म्हणाले. जगाच्या विविध भागात जिथे जिथे अनेक महत्वाचे प्रकल्प भारतीय कामगारांनी पूर्णत्वाला नेते तिथे त्यांची आठवण काढली जाते असं ते म्हणाले. भविष्यात रियाध मेट्रोसाठीही या प्रकल्पाच्या उभारणीतले भारतीय कामगारांचे योगदानही असंच आठवले जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

परदेशात काम करणाऱ्या भारतीयांना त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या पत्रांद्वारे माहिती मिळते, असं सांगून या पत्राच्या माध्यमातून त्यांचं सुख दु:ख वाटले जाते. तुमच्या परिवाराचा आपण एक भाग असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

परदेशात काम करु इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या ई मायग्रेट या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

आणखी कामगार संसाधन केंद्र उघडण्यात येतील तसंच मदत पोर्टलद्वारे केंद्र सरकारशी तात्काळ संपर्क साधता येईल असंही पंतप्रधान म्हणाले. जगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता भारतात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान हजारो कामगारांच्या समुदायानं त्यांना वेळोवेळी उत्स्फूर्त दाद दिली. पंतप्रधानांनी नंतर कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत अल्पोपहारही केला.

N.Chitle / I.Jhala / M. Desai