पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे कल्याण, शुभ, संरक्षण, शांती, ज्ञान आणि समृद्धी यासाठी आशीर्वाद देणारे एक संस्कृत सुभाषित शेअर केले. या सुभाषितात भगवान इंद्र, भगवान सूर्य, भगवान गरुड आणि भगवान बृहस्पती यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी सामायिक केलेले संस्कृत सुभाषित –
“स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥”
या सुभाषितात म्हटले आहे की,
वैभवशाली भगवान इंद्र आपणास कल्याणाचा आशीर्वाद देवो. संपूर्ण विश्वाचे ज्ञाते आणि सर्वांचे पालनपोषण करणारे भगवान सूर्य आपणास शुभ फल प्रदान करो. विघ्नहर्ता भगवान गरुड आपणा सर्वांचे रक्षण करोत. ज्ञानाचे अधिपती भगवान बृहस्पती आपणास शांती, बुद्धिमत्ता आणि समृद्धीचा आशीर्वाद देवोत.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
“स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥”
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः।
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2026
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥ pic.twitter.com/L4fAFZBSGQ