Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांविषयी व्यक्त केली कृतज्ञता


देशाच्या विविध भागांमध्ये अनेक सण साजरे केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आनंद आणि उत्साहाने भरलेल्या अशा प्रसंगांच्या कालखंडात, संपूर्ण देशाचे पोषण करणाऱ्या आपल्या कष्टाळू शेतकरी बंधू-भगिनींप्रति राष्ट्र कृतज्ञ आहे, असे त्यांनी नमूद केले.

 पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-

“इत्थं फलति शुद्धेन सिक्तं सङ्कल्पवारिणा।
पुण्यबीजमपि स्वल्पं पुंसां कृषिकृतामिव॥”

हे सुभाषित असा संदेश देते की, ज्याप्रमाणे शेतकऱ्याने पेरलेले छोटेसे बी योग्य वेळी पाणी दिल्यास हळूहळू वाढते आणि भरपूर पीक देते, त्याचप्रमाणे शुद्ध हेतूने केलेले छोटेसे प्रयत्नही व्यक्तीला मोठ्या यशाकडे घेऊन जातात.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले;

“देशाच्या विविध भागांमध्ये आता अनेक सण-उत्सव साजरे करण्यात आले आहेत. आकांक्षा आणि उत्साहाने भरलेल्या या प्रसंगांसाठी आपण आपल्या कष्टाळू शेतकरी बंधू-भगिनींचे कृतज्ञ आहोत, जे संपूर्ण देशाचे पोषण करतात.”

इत्थं फलति शुद्धेन सिक्तं सङ्कल्पवारिणा। 

पुण्यबीजमपि स्वल्पं पुंसां कृषिकृतामिव॥” 

***

NehaKulkarni / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai