Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या वाराणसीला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसीला भेट देणार आहेत.

वाराणसी शहरात आगमन झाल्यानंतर लगेच पंतप्रधान रिक्शा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 602 कुटुंबांना पॅकेज वितरीत करतील. पंतप्रधान 501 पेडल रिक्शा व 101 ई-रिक्शा वितरीत करतील, तसेच रिक्शा, हातगाडी आणि फेरीवाल्यांना 1000 सौर कंदिलांचे देखील वाटप करतील. यावेळी पंतप्रधान लाभधारकांना संबोधित करतील.

यानंतर, पंतप्रधान डीएलडब्ल्यू मैदानातील सार्वजनिक सभेत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा शुभारंभ करतील. काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होईल. यानंतर पंतप्रधान बनारस हिंदू विद्यापीठाच्या ट्रॉमा सेंटरचे, रिमोटद्वारे लोकार्पण करतील. तसेच रामनगर टपाल कार्यालयातील प्रवासी आरक्षण सुविधेचे देखील रिमोटद्वारे उद्‌घाटन करतील.

S. Mhatre/S.Tupe