Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक दौऱ्याला रवाना होण्यापूर्वीचे निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक दौऱ्याला रवाना होण्यापूर्वीचे निवेदन


नवी दिल्‍ली, 21 नोव्हेंबर 2025

 

मी 21-23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा दौरा करत आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.

ही एक विशेष शिखर परिषद असेल कारण ती आफ्रिकेत होणारी पहिली जी-20 शिखर परिषद असेल. 2023 मध्ये भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आफ्रिकी महासंघ जी- 20 चा सदस्य झाला होता.

ही शिखर परिषद प्रमुख जागतिक मुद्यांवर चर्चा करण्याची एक संधी असेल. या वर्षीच्या जी-20 ची संकल्पना ‘एकता, समानता आणि शाश्वतता’ अशी आहे, ज्याद्वारे दक्षिण आफ्रिकेने भारतातील नवी दिल्ली आणि ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या मागील शिखर परिषदांमधील निष्कर्ष पुढे नेले आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या आपल्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने मी या शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडणार आहे.

मी भागीदार देशांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास आणि शिखर परिषदेच्या दरम्यान होणाऱ्या सहाव्या आयबीएसए शिखर परिषदेत सहभागी होण्यास उत्सुक आहे.

तसेच या भेटीदरम्यान, मी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधण्यासही उत्सुक आहे. हा भारताबाहेरचा हा सर्वात मोठ्या भारतीय प्रवासी समुदायांपैकी एक आहे. 

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai