Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये 7 ते 9  फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले. या महोत्सवादरम्यान बस्तर इथल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आदिवासी वारशाचे अदभुतरम्य दर्शन घडले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि स्थानिक समुदायांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

याआधी जेव्हा जेव्हा बस्तर चा उल्लेख होत असे तेव्हा नक्षलवाद, हिंसा आणि विकासातील मागासलेपणा अशा गोष्टी मनात येत असत. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. आज बस्तर केवळ येथील विकासासाठी नव्हे तर इथल्या स्थानिक लोकांमधील वाढत्या आत्मविश्वासाबद्दल ओळखले जाऊ लागले आहे. येणाऱ्या काळात या प्रदेशात शांती, प्रगती आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना वाढीस लागावी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:

“छत्तीसगडमध्ये 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान, ‘बस्तर पांडुम’ हा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात बस्तरची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आदिवासी वारसा भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला. या प्रयत्नात सहभागी असलेल्या माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून अभिनंदन. अशा कार्यक्रमांमुळे आपला सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि स्थानिक समुदायांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते.”

पूर्वी, जेव्हा बस्तरचा उल्लेख केला जात असे, तेव्हा ते माओवाद, हिंसाचार आणि विकासातील मागासलेपणाचे चित्र निर्माण करत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज, बस्तर त्याच्या विकासासाठी तसेच स्थानिक लोकांच्या वाढत्या आत्मविश्वासासाठी ओळखले जाते. येथील भविष्य शांतता, प्रगती आणि सांस्कृतिक अभिमानाने भरलेले असावे अशी माझी इच्छा आहे.”

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai