पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील इटी नाऊ जागतिक व्यवसाय शिखर परिषदेची क्षणचित्रे सामाइक केली. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ‘अडथळ्यांचे दशक, बदलाचे शतक’ या परिषदेच्या संकल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले. 21 व्या शतकाच्या गेल्या दशकात जागतिक साथ, तणाव आणि विविध भागांत सुरू झालेली युद्धे तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे बिघडलेले जागतिक संतुलन अशा अभूतपूर्व संकटांचा सामना जगाने केला या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. संकटांच्या काळातच देशाची खरी ताकद कळते असे सांगून या संकटांमधून मार्ग काढत भारताने या दशकात उल्लेखनीय प्रगती केली, उत्कृष्ट कामगिरी केली आणि लोकशाहीदेखील बळकट केली असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भारत जगाच्या विकासाला दिशा देईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नवे इंजिन म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशांमध्ये मोदी म्हणतात,
“अनेक अडचणींच्या काळातही हे दशक भारतासाठी अभूतपूर्व विकासाचे दशक ठरले. अडचणींवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि उत्कृष्ट कामगिरी यामुळे आपली लोकशाही बळकट झाली.”
Amid numerous disruptions, this decade has been one of unprecedented development for India, marked by strong delivery and by efforts that have strengthened our democracy. pic.twitter.com/CBAhs933Gf
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
“21 व्या शतकाच्या या दशकामध्ये भारत सुधारणांच्या वारुवर स्वार झाला आहे.”
In this decade of the 21st century, India is riding the Reform Express. pic.twitter.com/6psr2ObG7C
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
“आम्ही अर्थसंकल्पात केवळ आराखडा मांडण्यावर भर दिला नाही; तर परिणाम केंद्रित अर्थसंकल्प तयार केला.”
We have made the Budget not only outlay-focused but also outcome-centric. pic.twitter.com/Ic8lRrRuhD
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
“गेल्या दशकात आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे विकासाला दिशा देणारे प्रमुख घटक म्हणून पाहिले.”
Over the past decade, we have regarded technology and innovation as the core drivers of growth. pic.twitter.com/OormGf11x5
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
“आज आपण जगातल्या विविध देशांबरोबर व्यापार करार करत आहोत; कारण आज भारताकडे आत्मविश्वास आहे आणि भारत जगाशी स्पर्धा करायला सज्ज आहे.”
Today, we are entering into trade deals with the world because today’s India is confident and ready to compete globally. pic.twitter.com/BHrU0raO4i
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
***
हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Amid numerous disruptions, this decade has been one of unprecedented development for India, marked by strong delivery and by efforts that have strengthened our democracy. pic.twitter.com/CBAhs933Gf
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
In this decade of the 21st century, India is riding the Reform Express. pic.twitter.com/6psr2ObG7C
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
We have made the Budget not only outlay-focused but also outcome-centric. pic.twitter.com/Ic8lRrRuhD
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
Over the past decade, we have regarded technology and innovation as the core drivers of growth. pic.twitter.com/OormGf11x5
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
Today, we are entering into trade deals with the world because today's India is confident and ready to compete globally. pic.twitter.com/BHrU0raO4i
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026