Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याशी संवाद साधला


नवी दिल्‍ली, 30 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. “भारत-नेदरलँड्स संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. सेमीकंडक्टर्स, मेगा वॉटर प्रोजेक्ट्स, हरित हायड्रोजन आणि टॅलेंट मोबिलिटी यासारख्या क्षेत्रातील परस्परांबरोबरची संभाव्य भागीदारी आम्ही अधोरेखित केली”, असे मोदी यांनी म्हटले आहे. पश्चिम अशिया क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य लवकर पुनर्स्थापित करण्याच्या गरजेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले आहे:

“नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याशी आज संवाद साधून आनंद वाटला. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. सेमीकंडक्टर्स, मेगा वॉटर प्रोजेक्ट्स, हरित हायड्रोजन आणि टॅलेंट मोबिलिटी यासारख्या क्षेत्रातील परस्परांबरोबरची संभाव्य भागीदारी आम्ही अधोरेखित केली. पश्चिम आशियातील परिस्थितीवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.”

@MinPres 

 

* * *

राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai