Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर येथे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले


नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत आणि जखमींना 50,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य घोषित केले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“जम्मू काश्मीर मध्ये उधमपूर येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीचे वृत्ती ऐकून व्यथित झालो आहे. या अपघातात आपल्या जिवलगांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो.

या  अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”

 

* * *

नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai