पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 21 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथील ‘रेड रोड’वरून 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व केले. मोदी हजारो योग साधकांसोबत ‘सामायिक योग प्रोटोकॉल’ सत्रात सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातील लोकांना शुभेच्छा देताना मोदी यांनी नमूद केले की, 21 जून हा दिवस जगाच्या अनेक भागांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगच्या माध्यमातून मानवतेचा एक सर्वात मोठा सामूहिक उत्सवाचा दिवसही बनला आहे.
कोलकाता येथे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जगाच्या विविध भागांमधून योगाभ्यासाची प्रेरणादायी दृश्ये पाहायला मिळत आहेत. “हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत आणि बंगाल व ईशान्येकडील भागांपासून ते सौराष्ट्राच्या पश्चिम भागापर्यंत, संपूर्ण राष्ट्र योगच्या भावनेने चैतन्यमय झालेले दिसत आहे. आरोग्य आणि सुसंवाद साधण्याच्या सामायिक वचनबद्धतेद्वारे देश आणि जग एकमेकांशी जोडले गेल्याचे दिसून आले, जे योगच्या एकीकरणाच्या शक्तीचेच प्रतीक आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘स्वच्छता से स्वागत’ उपक्रमांतर्गत कोलकाताच्या जनतेची त्यांच्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली. ते म्हणाले की, स्वच्छता राखण्याच्या बाबतीत नागरिकांनी दाखवून दिलेले समर्पण, कठोर परिश्रम आणि नागरिकत्वाची जबाबदारीची भावना ही देशभरातील लोकांसाठी प्रेरणा ठरली आहे.
पश्चिम बंगालचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या पार्श्वभूमीवर तिथे योग दिन साजरा करण्याला विशेष महत्त्व आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, बंगाल ही भगवान रामकृष्ण परमहंस यांची कर्मभूमी होती; येथूनच स्वामी विवेकानंदांनी भारताचे आध्यात्मिक ज्ञान आणि योग परंपरा यांची जगाला ओळख करून दिली; तसेच महर्षी अरविंद आणि लाहिरी महाशय यांनी योगविषयक विचार आणि साधनेच्या प्रगतीत भरीव योगदान दिले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, मानवाची खरी ओळख ही आपल्या सभोवतालच्या जगाशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांतून घडते आणि हेच तत्त्व योगाच्या केंद्रस्थानी आहे. ‘संपूर्ण जीवन म्हणजेच योग’ या महर्षी अरविंदांच्या विचाराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, जेव्हा योग हा एखाद्याच्या स्वभावाचा भाग बनतो, तेव्हा तो मानवी एकतेचा पाया अधिक बळकट करतो. “योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नाही आणि तो कोणत्याही विशिष्ट वयोगटापुरता मर्यादितही राहू शकत नाही. तो चेतना, ऊर्जा आणि आंतरिक प्रकाशाचा स्रोत आहे, जो मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला समृद्ध करतो,” यावर मोदी यांनी भर दिला . या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना असलेल्या ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ चा उल्लेख करत ते म्हणाले की, वाढत्या वयातही निरोगी, सक्रिय आणि उत्साही राहण्याचा मार्ग योग दाखवतो.
निरोगी वृद्धत्व’ म्हणजे वाढत्या वयामुळे मानवी क्षमता कमी होणार नाही याची काळजी घेणे आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, योगसाधना आयुष्यभर निरंतर विकास आणि आपल्यात सुधारणा करण्यास प्रोत्साहन देते. व्यक्तींनी वयाच्या विशीच्या तुलनेत चाळीशीत अधिक लवचिक, तिशीच्या तुलनेत पन्नाशीत अधिक उत्साही आणि पन्नाशीच्या तुलनेत सत्तरीत जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करण्यास अधिक सक्षम राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, योग लवचिकता वाढवण्यास, ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतो, तसेच जीवनशैलीशी संबंधित आजार रोखण्यासही सहाय्य करतो. “योगाच्या नियमित सरावामुळे योग आपल्याला आयुष्यभर आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि मनाबद्दल सतत शिकवत असतो. आपण स्वतःबद्दल जितके अधिक जाणून घेऊ, तितकेच आपण स्वतःचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो,” असे मोदी यांनी नमूद केले.
“निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही संकल्पना केवळ वृद्धांपुरती मर्यादित नाही, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे, त्यामुळे आरोग्य, कल्याण आणि वैयक्तिक वाढीच्या प्रवासात योग हा आयुष्यभराचा सोबती बनतो.
भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत मोदी म्हणाले, “संतुलित आहार, संतुलित विहार, संतुलित कृती आणि संतुलित झोप व जागरूकता यामुळेच योग हा दुःखावर मात करण्याचे साधन बनतो.” हे संतुलन हाच योगाचा पाया आहे आणि परिपूर्ण आयुष्यासाठी तो तितकाच आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. योग आपल्याला संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो. काय करावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन करून, योग व्यक्तीला अधिक आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यास मदत करतो.
योग केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर तो मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्गही दाखवतो यावर त्यांनी भर दिला. “युक्तचेष्टस्य कर्मसु” या वचनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, काय करावे आणि काय करू नये यांमधील फरक ओळखण्याची समज विकसित करण्यास योग मदत करतो. “अशा प्रकारची जाणीव आंतरिक शांततेचा स्रोत बनते आणि जागतिक शांततेचा मार्गही सुकर करते. योग आता केवळ वैयक्तिक जीवनशैलीचा भाग म्हणून मर्यादित राहिलेला नाही, तर जगाचे उत्तम भविष्य घडवण्यासाठी तो एक आवश्यक घटक बनला आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त दरवर्षी लाखो लोक योग उपक्रमांमध्ये सहभागी होतात तसेच हा दिवस योगसाधनेला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा सामूहिक संकल्प नव्याने करण्याचीही संधी देतो असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. त्यांनी लोकांना आवाहन केले की, योग केवळ एका दिवसापुरता किंवा एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, तो त्यांच्या स्वतःच्या, त्यांच्या कुटुंबाच्या आणि भावी पिढ्यांच्या जीवनाचा कायमस्वरूपी भाग बनेल याकडे लक्ष द्यावे.
पंतप्रधानांनी या वर्षी ‘योग 365’ उपक्रमांतर्गत झालेली प्रगतीही अधोरेखित केली. “या उपक्रमांतर्गत 100 दिवसांचा ऑनलाइन योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यात अभूतपूर्व लोकसहभाग दिसून आला. 130 देशांमधील 30 लाखांहून अधिक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, जे योगाचा वाढता जागतिक स्वीकार आणि लोकप्रियता दर्शवते,” असे मोदी म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना मोदी म्हणाले की, एक निरोगी समाजच अधिक सशक्त, समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण राष्ट्राचा पाया रचतो. सर्वांच्या कल्याणासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांनी ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ (सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहोत) या प्राचीन प्रार्थनेचा उल्लेख केला.
From physical wellness to inner peace, yoga enriches every aspect of life. Delighted to join this year’s celebrations in Kolkata. https://t.co/75UZECw8JR
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2026
Yoga connects us all and brings us together. pic.twitter.com/ghpAAVOmxE
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
When yoga becomes a way of life, it becomes the foundation of human unity. pic.twitter.com/FLxB961hWN
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
Yoga helps us tune our bodies to be flexible.
It keeps our energy levels high. pic.twitter.com/zQxvJeJwv8
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
Yoga teaches us the art of living a balanced life. pic.twitter.com/gcfmQX9dmM
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
Yoga shows the path from mental well-being to physical well-being. pic.twitter.com/O81tKmKfHi
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
* * *
आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
From physical wellness to inner peace, yoga enriches every aspect of life. Delighted to join this year’s celebrations in Kolkata. https://t.co/75UZECw8JR
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2026
Yoga connects us all and brings us together. pic.twitter.com/ghpAAVOmxE
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
When yoga becomes a way of life, it becomes the foundation of human unity. pic.twitter.com/FLxB961hWN
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
Yoga helps us tune our bodies to be flexible.
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
It keeps our energy levels high. pic.twitter.com/zQxvJeJwv8
Yoga teaches us the art of living a balanced life. pic.twitter.com/gcfmQX9dmM
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026
Yoga shows the path from mental well-being to physical well-being. pic.twitter.com/O81tKmKfHi
— PMO India (@PMOIndia) June 21, 2026