पीएम्इंडिया
नवी दिल्ली,30 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मोहम्मद बेसिल मोरसिंगनाकथ याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी त्याच्या धावण्याच्या वेगाची आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे नमूद केले.
हे यश मोहम्मद बेसिल मोरसिंगनाकथ याची कठोर मेहनत आणि एकाग्रता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यात त्याला अधिकाधिक यश मिळो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“मोहम्मद बासिल मोर्सिंगानकाथने पटकावले शानदार रौप्यपदक! अप्रतिम वेग आणि जिद्दीचे दर्शन! या यशाबद्दल आणि यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याचे यश त्याच्या कठोर परिश्रम आणि एकाग्रतेचे प्रतिबिंब आहे. भविष्यातही त्याने अशीच नवी शिखरे सर करावीत, यासाठी शुभेच्छा.”
#CWG2026
A superb Silver for Mohammed Basil Morssinganakath! What a sprint and display of determination! Congratulations to him for the success and also achieving his Season Best. His success reflects his hard work and focus. May he continue to scale new heights in the times to come.…
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2026
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com