पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या राजधानी नवी दिल्लीत मुद्रा लाभार्थींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात १०० मुद्रा लाभार्थींशी संवाद साधणार आहेत. हे१०० ‘मुद्रा’ लाभार्थी देशातील विविध ठिकाणांहून सहभागी होणार आहेत.
नवयुवकांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, कोणत्याही हमीशिवाय उद्योग व्यवसायाला सवलतीच्या व्याजदरामध्ये वित्त पुरवठा केला जातो. 23 मार्च, 2018 पर्यंत देशभरातील 4,53,51,509 जणांची कर्जप्रकरणे मुद्रा योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत. तर आत्तापर्यंत 2,28,144,72 कोटी रूपये कर्ज सरकारने मंजूर केले आहे. त्याचबरोबर सरकारने मुद्रा योजनेमधून लाभार्थींना प्रत्यक्षात 220596.05 कोटी रूपयांची कर्जे वितरीत केली आहेत.
सरकारने दि. 8 एप्रिल 2015 रोजी ‘मुद्रा’ योजनेची घोषणा केली. लहान प्रमाणावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवउद्योजकांना प्रोत्साहन म्हणून वित्त पुरवठा करण्याची सुविधा ‘मुद्रा’ योजनेमुळे झाली आहे. यामध्ये वित्त पुरवठा सुविधेसाठी ‘शिशू’, ‘किशोर’ आणि ‘तरूण’ अशी तीन गटामध्ये वर्गवारी करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, 10 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व्यावसायांना ‘पीएमएमवाय’नुसार कर्ज देण्यात येते. शिशू गटामध्ये 50हजार रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. 50 हजार ते 5 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज ‘किशोर’गटातील लाभार्थींना देण्यात येते. तसेच 5 लाख ते 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज ‘तरूण’ गटातील लाभार्थींना देण्यात येते.
या कर्जाऊ रकमेचा वापर करून नवउद्योजक कृषीसेवा पूरक व्यवसाय, तसेच इतर कोणत्याही सेवा पुरवण्याचा, उद्योगांना पूरक सेवा देण्याचा व्यवसाय करू शकतात. त्यामधून लाभार्थीला चांगले उत्पन्न मिळू शकते. (या योजनेमध्ये पीक कर्जाचा समावेश नाही. तसेच भूमी सुधारणा, जलसिंचन कामे, कालव्यांची कामे , विहीर खोदणे आणि इतर कामे करण्यासाठी ‘मुद्रा’योजनेतून कर्ज देण्यात येत नाही. ) इतर कोणत्याही सेवा क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी सरकारने एप्रिल, 2016 पासून प्रधान मंत्री मुद्रा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
बी. गोखले/ एस. बेडेकर
On 11th April, I look forward to a special programme! I will be interacting with beneficiaries of the Mudra Yojana at my residence. It would be wonderful to speak to them and personally hear about their journeys.
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2018