Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 18 ऑक्टोबर रोजी 90व्या इंटरपोल महासभेला करणार संबोधित


नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2022

नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या  90 व्या महासभेला  पंतप्रधान  नरेंद्र मोदी 18 ऑक्टोबर रोजी  दुपारी 1:45 च्या सुमाराला  संबोधित करतील.

इंटरपोलची  90 वी महासभा 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या बैठकीला इंटरपोलच्या 195 सदस्य देशांचे मंत्री, देशांचे पोलिस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्यूरोंचे  प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश असणारी प्रतिनिधीमंडळे सहभागी होणार आहे. महासभा ही इंटरपोलची  सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे आणि तिच्या कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वर्षातून एकदा बैठक होते.

इंटरपोलच्या  महासभेची बैठक सुमारे 25 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात होत आहे. यापूर्वी भारतात  1997 मध्ये ती  आयोजित करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने  2022 मध्ये नवी दिल्ली येथे इंटरपोलची  महासभा आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव महासभेने प्रचंड बहुमताने मान्य केला.    भारताच्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट पद्धती संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी या आयोजनामुळे मिळणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी आणि महासचिव युर्गन  स्टॉक, सीबीआयचे संचालकही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai