पीएम्इंडिया
संरक्षण क्षेत्रात स्वदेशी संशोधन क्षमतांना चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 2 जानेवारी 2020 रोजी पाच डीआरडीओ युवा शास्त्रज्ञ प्रयोगशाळा राष्ट्राला समर्पित करतील.
बंगळुरुच्या डीआरडीओस्थित ॲरोनॉटिकल विकास संस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान या प्रयोगशाळांच्या समर्पणाचे प्रतिक म्हणून एका पट्टीकेचे अनावरण करतील आणि शास्त्रज्ञांना संबोधित करतील.
यावेळी आयोजित प्रदर्शनात डीआरडीओ पंतप्रधानांना काही नाविन्यपूर्ण उत्पादनांची ओळख करुन देतील.
मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
2014 मध्ये संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था पुरस्कार प्रदान केल्यानंतर वरिष्ठ आणि प्रसिद्ध संरक्षण वैज्ञानिक तसेच सशस्त्र दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी नाविन्यपूर्ण संशोधनासाठी 35 वर्षांपर्यंतच्या तरुण वैज्ञानिकांसाठी किमान 5 डीआरडीओ प्रयोगशाळा उभारण्याची सूचना केली होती.
त्यावेळी पंतप्रधानांनी संरक्षण, संशोधन संबंधी उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले होते. जेणेकरुन या क्षेत्रातील जागतिक तंत्रज्ञानविषयक प्रगतीबाबत भारत जागरुक राहिल.
******
S.Tupe/S.Kane/D.Rane
In a boost to indigenous research capabilities in the defence sector, Prime Minister Shri Narendra Modi will dedicate Five DRDO Young Scientists Laboratories to the nation in Bengaluru tomorrow.
— PMO India (@PMOIndia) January 1, 2020
On the 3rd, PM @narendramodi will address the Indian Science Congress, which brings together leading scientists, researchers and science enthusiasts from different parts of the nation.
— PMO India (@PMOIndia) January 1, 2020