Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पठाणकोटच्या हल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, म्हैसूर मधल्या अवधूत दत्त पीठाला पंतप्रधानांची भेट: श्री. सुत्तुर मठाचे जगत्‌गुरु डॉ. श्री. शिवरात्री राजेंद्र महास्वामीजी यांच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमालाही पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट इथल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. मानवतेच्या शत्रूंना, राष्ट्राची प्रगती पाहवत नाही त्यांनी भारतीय लष्कराला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाई दरम्यान शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे. दहशतवादयांचे कुटील मनसुबे यशस्वीपणे उधळून लावल्याबद्दल त्यांनी लष्कराची प्रशंसा केली आहे. आपले जवान आणि सुरक्षा दलांचा आपल्याला अभिमान वाटतो. संपूर्ण देश या शत्रू विरोधात एकजूटीने उभा आहे. आणि म्हणूनच शत्रूची कुटील कारस्थाने कधी यशस्वी ठरणार नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. म्हैसूर मधल्या महाराजा महाविद्यालय, मैदानात श्री. सुत्तूर मठाचे परमपूज्य जगत्‌गुरु श्री. शिवरात्री राजेंद्र महास्वामीजींच्या शताब्दी समारंभानिमित्त आयोजित जाहिर सभेत पंतप्रधान बोलत होते.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज म्हैसूर इथे आगमन झाले. कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला आणि मुख्यमंत्री सिद्‌धरामय्या यांनी म्‍हैसूर विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले.

पंतप्रधानांनी अवधूत दत्त पीठाला भेट देऊन श्री. गणपती सच्चिदानंद स्वामीजींचीही भेट घेतली. पंतप्रधानांनी दत्त मंदीराचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याना पीठम् सन्मान प्रदान करण्यात आला. भारतातल्या ऋषीमुनी तसेच संतांनी समाजासाठी मोठे कार्य केले मात्र त्याची योग्य ती प्रशंसा झाली नसल्याचे पंतप्रधानांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. या संदर्भात अवधूत दत्त पीठाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला यावेळी उपस्थित होते.

म्हैसूर मधल्या महाराजा महाविद्यालय मैदानात श्री. सुत्तुर मठाचे परमपूज्य जगत्‌गुरु डॉ. श्री. शिवरात्री राजेंद्र महास्वामीजी यांच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. ज्ञान संशोधन केंद्राचा पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते झाला. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना अनेक शतकांपूर्वी संत बसवेश्वरांनी समाज सुधारणेचा मार्ग दाखविल्याचे पंतप्रधान म्हणाले. लंडनमध्ये काही दिवसांपूर्वी श्री. बसवेश्वरांच्या पुतळयाचे अनावरण करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे स्मरण त्यांनी यावेळी केले. भारतीय समाज वैशिष्टयपूर्ण आहे कारण इथे समाजसुधारणेसाठी समाजातल्या वाईटाविरुध्द लढा देण्यासाठी त्या त्या काळात समाजसुधारक निपजत राहिले- असे पंतप्रधान म्हणाले 18 व्या आणि 19 व्या शतकातल्या सामाजिक सुधारणा पाया ठरल्याचे त्यांनी सांगितले. 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. आणि जो देश ज्ञान आणि

नवकल्पनांवर भर देईल तो देश या शतकात जगाचे नेतृत्व करेल. ज्ञान संशोधन केंद्रासाठी जगत्‌गुरु डॉ. ज्ञी. शिवरात्री राजेंद्र महास्वामीजी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्‌दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.

पॅरिस मध्ये नुकत्याच झालेल्या सीओपी 21 च्या बैठकीचे मिशन इनोव्हेशन आणि आंतरराष्ट्रीय सौर युती बाबतच्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी स्मरण केले. यामधे भारताने आघाडीची भूमिका बजावली होती.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला, मुख्यमंत्री सिद्‌धरामय्या आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार, डी. व्ही. सदानंद गौडा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

SmkN.ChitleI.Jhala