पीएम्इंडिया
पर्यटन क्षेत्रात भारत आणि पॅराग्वे यांच्यातले सहकार्य दृढ करण्यासाठीच्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी देण्यात आली. नवी दिल्लीत 27 सप्टेंबर 2019 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
वैशिष्ट्ये आणि मुख्य उद्दिष्टे
लाभ
भारत आणि पॅराग्वे यांच्यातल्या या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशात पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी, संस्थात्मक यंत्रणा निर्माण करण्यासाठी मदत होईल. पॅराग्वेमधून भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांमधे वाढ व्हायला यामुळे मदत होणार आहे परिणामी आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor