Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि किरजीस्तान यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि किरजीस्तानचे सांस्कृतिक,माहिती आणि पर्यटन मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.

या करारामुळॆ , दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी परस्परांच्या देशात पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी रचनात्मक चर्चा होऊ शकेल. किरजीस्तानबरोबर या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर या देशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.

सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे –

१. पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य विस्तारणे

२. पर्यटनाशी संबंधित माहितीचे आदान-प्रदान

३. हॉटेल आणि सहल आयोजकांसह पर्यटन हितधारकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे

४. मनुष्यबळ विकासामध्ये सहकार्यासाठी आदान-प्रदान कार्यक्रम तयार करणे

५. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात गुंतवणूक

६. परस्परांच्या देशात प्रवास प्रदर्शने/जत्रा यात सहभागी होणे

७. सुरक्षित आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन

(B.Gokhale/ S.Kane)