Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या उभारणीसाठी सुधारित खर्चाला मंजुरी


पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या उभारणीसाठी 4,799 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी सुरुवातीला 2,500 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. कोलकात्ता, पुणे, मोहाली, भोपाळ आणि थिरुवनंतपुरम इथे या संस्था उभारल्या जात आहेत.

या पाचही संस्थांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून सुधारित खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे कामाची गती वाढवणे आणि 9,275 विद्यार्थी, 928 अध्यापक आणि 1,020 कर्मचारी असलेल्या या संस्था सन 2018-19 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करता येणे मंत्रालय आणि संस्थांच्या प्रशासकीय मंडळांना शक्य होईल.

या संस्थांमधून एकाच छत्राखाली पदवीपूर्व शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन होईल. संशोधनासाठी समन्वयी वातावरण विकसित करण्यासाठी या संस्था राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि इतर संशोधन संस्थांशी समन्वय साधतील. आंतरशाखीय संशोधनाला यामुळे चालना मिळेल.

मूलभूत विज्ञान आणि तसेच उपयोजित विज्ञान यातील संशोधनातून बौध्दिक संपदा निर्माण होईल ज्यात मोठया प्रमाणात महसूल निर्माण करण्याची क्षमता आहे.

S.Kulkarni/S.Tupe/B.Gokhale