पीएम्इंडिया
पॅरिसमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करत आहे. या हल्ल्यात शंभरपेक्षाही अधिक लोकांना आपली आवड जोपासताना आणि आपल्या प्रियजनांसोबत असताना प्राण गमवावे लागले.
फ्रान्सच्या जनतेचे दुःख, वेदना आणि आक्रोश आम्ही जाणतो. या भयंकर घटनेप्रसंगी भारत फ्रान्सच्या जनतेसोबत आहे. आपण सर्वांनी मानवतेच्या भावनेतून एकत्र येऊन या वैश्विक संकटाचा सामना केला पाहिजे, आणि आपली मूल्ये जतन केली पाहिजेत.
S. Thakur/S.Tupe/N.Sapre
My heart is filled with sadness due to what happened in Paris. This was an attack on entire humanity & humanitarian forces: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 14, 2015