Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

फ्रान्समधील पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज कांस्य पदक जिंकणाऱ्या  भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी या संघाच्या कौशल्याची,चिकाटीची आणि सांघिक भावनेची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“पुढच्या अनेक पिढ्यांकडून गौरवला जाईल असा एक पराक्रम!

भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये चमकला,कांस्यपदक जिंकले! ऑलिम्पिक स्पर्धेतील त्यांचे हे सलग दुसरे पदक आहे, ही आणखी विशेष बाब.

हे यश म्हणजे त्यांचे कौशल्य,चिकाटी आणि सांघिक भावनेचा विजय आहे. त्यांनी प्रचंड धैर्य आणि लवचिकता दाखवली.खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन.

प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि या कामगिरीमुळे हा खेळ आपल्या देशातील तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होईल.”

 N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai