Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅसिफिक पेंशन ॲण्ड इन्व्हेस्टमेंट संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

पॅसिफिक पेंशन ॲण्ड इन्व्हेस्टमेंट संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाने संस्थेचे अध्यक्ष लियोनल सी. जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारतातील आर्थिक सुधारणांची प्रतिनिधी मंडळाने प्रशंसा केली आणि देशातील क्षमतांच्या विकासावर जोर दिला. थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय), वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यासारख्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

पंतप्रधानांनी यावेळी भारतातील गुंतवणुकीच्या विविध शक्यता अधोरेखित केल्या. व्यापार सुलभीकरणासाठी उचललेली विविध पावले आणि उपाययोजनांबद्दल यावेळी मोदींनी माहिती दिली. सक्षम आर्थिक मूलतत्त्वांसह भारतातील लोकांच्या वाढत्या आकांक्षा या गुंतवणुकीसाठी लक्षणीय संधी उपलब्ध असल्याचे द्योतक आहे. नवीकरणीय ऊर्जा आणि सेंद्रीय शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असेही मोदी यावेळी म्हणाले.

N.Sapre/S.Mhatre/P.Kor