Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“प्रकल्प विकास निधी”ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 500 कोटींच्या प्रकल्प विकास निधीला मान्यता देण्यात आली. या संयुक्त निधीतून कांबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम येथील प्रकल्पांमध्ये भारत गुंतवणूक करणार आहे.

वाणिज्य विभागाच्यावतीने प्रकल्प विकास निधी उभारण्यात येणार असून एक्झिम बँकेच्यामार्फत या निधीचा वापर करण्यात येणार आहे. आंतरमंत्रालय समितीच्या माध्यमातून या प्रकल्प विकास निधीचे व्यवस्थापन करण्यात येणार असून समितीचे अध्यक्ष म्हणून वाणिज्य सचिव कार्य पाहणार आहेत.

NS/SB/AK