Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रख्यात पार्श्वगायक श्री पी. जयचंद्रन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पार्श्वगायक पी. जयचंद्रन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांसाठी हृदयाला स्पर्श करत राहील असे म्हंटले आहे. 
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर वर पोस्ट केले की ; 
“श्री पी. जयचंद्रन जी यांना विविध भावना प्रभावीपणे व्यक्त करणाऱ्या आवाजाचे वरदान लाभले होते. विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करत राहील. त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.”

***

SonalT/HemangiK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai