Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“प्रगती” च्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद

“प्रगती” च्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद

“प्रगती” च्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तत्पर प्रशासन आणि कालबध्द अंमलबजावणीसाठीचे मल्टीमोडल व्यासपीठ “प्रगती”चा सातवा संवाद आज झाला.

प्रधानमंत्री जनधन योजनेशी संबंधित तक्रारींचा आढावा यावेळी पंतप्रधानांनी घेतला. जनधन बँक खात्यांतून उपलब्ध होणाऱ्या लाभांबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी विशेष करुन मोबाईल फोन्सच्या माध्यमातून जनजागृती मोहिम हाती घेण्यात यावी असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधानांनी रेल्वेसंबंधी समस्यांचाही विशेषत: स्वच्छताविषयक समस्यांचा आढावा घेतला. रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाडयांमधील स्वच्छताविषयी पावले उचलावीत असे निर्देशही त्यांनी दिले.

भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याच्या कामातील प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा विषयक कोणत्याही मुद्दयाबाबत तडजोड केली जाणार नाही, हे स्पष्ट करुन बांगलादेशाशी सीमा निगडीत असणाऱ्या सर्व 5 राज्यांच्या सचिवांनी, या प्रकल्पातील कामे लवकर पूर्ण होण्यासाठी कार्य करावे, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

जम्मू-काश्मिर, आसाम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ आणि गोव्यातील महामार्ग, रेल्वे, ऊर्जा, कोळसा आणि विमानतळ क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयीची ताजी माहिती पंतप्रधानांनी जाणून घेतली. भूतानमधल्या तीन जलविद्युत प्रकल्पांच्या कामातील प्रगतीविषयी ही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

आधार कार्ड नोंदणीतील प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. लोकांचा लाभ व्हावा आणि अनुदानातील गळती थांबण्यासाठी या उद्देशाने जनधन बँक खाती आणि आधार कार्डाच्या यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सर्व मुख्य सचिवांनी कार्य करावे असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

J.Patnakar/S.Tupe