Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी समाज माध्यमावर शेअर केले


नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की प्रजासत्ताक दिन हे भारताच्या स्वातंत्र्याचे, संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे बलवान प्रतीक आहे. हा दिवस देशाला एकत्र येऊन राष्ट्र बांधणीच्या दृढ संकल्पासह पुढे जाण्यासाठी नव्या ऊर्जेची आणि प्रेरणेची स्फूर्ती देतो, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर शेअर केले—

“पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः। अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥”

या सुभाषिताचा आशय असा आहे की परावलंबी किंवा अधीन असलेल्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, म्हणून स्वातंत्र्य आणि ऐक्य ही मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारूनच राष्ट्राची प्रगती निश्चित करता येते.

पंतप्रधानांनी ‘X’ वर लिहिले,

“प्रजासत्ताक दिन हे आमच्या स्वातंत्र्याचे, संविधानाचे आणि लोकशाही मूल्यांचे बलवान प्रतीक आहे. हा दिवस आम्हाला एकजुटीने राष्ट्र बांधणीचा संकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतो.”

पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः।

अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥”

 

* * *

यश राणे / रेश्मा बेडेकर / दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai